India Corona Update : 1.6 कोटी रुग्ण कोरोनामुक्त, देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – देशात नव्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 395 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 06 लाख 625 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 143 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 92 हजार 746 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 06 लाख 625 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 36 हजार 571 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 55 लाख 33 हजार 398 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 43 हजार 614 नमून्यांची तपासणी शुक्रवारी (दि.12) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 103 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 550 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. देशात आतापर्यंत 79 लाख 67 हजार 647 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.