India Corona Update : देशात 1.60 लाख सक्रिय रुग्ण, 24 तासांत 11,039 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 11 हजार 039 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या देशात 1 लाख 60 हजार 057 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 07 लाख 77 हजार 284 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 04 लाख 62 हजार 631 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 14 हजार 228 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

_MPC_DIR_MPU_II

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 84 लाख 73 हजार 178 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 21 हजार 121 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.2) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 110 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 596 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. तर, रिकव्हरी रेट 97.08 टक्के एवढा झाला आहे.

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 41 लाख 38 हजार 918 जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेश मध्ये झाले आहे. उत्तर प्रदेश मध्ये 4 लाख 63 हजार 793 जणांना लस टोचण्यात आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 18 हजार 735 जणांना लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1