India Corona Update : देशात 1.70 लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत 14,989 नव्या रुग्णांची वाढ 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 989 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात नव्याने वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. सध्याच्या घडीला देशात 1.70 लाख रुग्ण उपचाराधिन आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 39 हजार 516 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 08 लाख 12 हजार 044 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 13 हजार 123 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्याच्या घडीला 1 लाख 70 हजार 126 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशात 98 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 346 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 56 लाख 20 हजार 749 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.