India Corona Update : वाढता वाढे ! 24 तासांत 1.94 लाख नवे कोरोना रुग्ण, 442 मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 868 एवढी झाली आहे.  

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 60 लाख 70 हजार 550 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 46 लाख 30 हजार 536 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 60 हजार 405 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या देशात 9 लाख 55 हजार 319 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 442 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 84 हजार 655 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे. तर रिकव्हरी रेट 96.01 टक्के एवढा आहे.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 69.52 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 153.80 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.