India Corona Update : देशात 1 कोटी 3 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 96.81 टक्के 

एमपीसी न्यूज : देशात नव्याने वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 17 हजार 130 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजवर 1 कोटी 3 लाख 838 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रिकव्हरी रेट 96.81 टक्के एवढा झाला आहे. 

देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 06 लाख 39 हजार 684 एवढी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 85 हजार 662 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 09 लाख 85 हजार 119 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 37 हजार 095, नमून्यांची तपासणी शुक्रवारी (दि.22) करण्यात आली आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 152 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 53 हजार 184 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌. देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 47 हजार 058 जणांना लस टोचण्यात आली. देशात आतापर्यंत 13 लाख 90 हजार 592 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.