Vadgaon Maval: ‘निसर्ग’चा फटका बसलेल्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी पावणे दोन कोटींचा निधी

1 crore 66 lakh sanctioned for repair work of Zilla Parishad schools and Anganwadis affected by nisarga cyclone निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्यात मोठयाप्रमाणावर बसला आहे.

एमपीसी न्यूज- जून महिन्याच्या सुरुवातीला मावळ तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात वादळाचा मोठा फटका तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि शाळांना बसला होता. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडींचे यात मोठे नुकसान झाले होते. या शाळांच्या दुरूस्तीसाठी 1 कोटी 32 लाख 75 हजार रूपये व अंगणवाडयांच्या दुरूस्तीसाठी 34 लाख रूपये असा एकूण 1 कोटी 66 लाख 75 हजार रूपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी दिली आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्यात मोठयाप्रमाणावर बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील 83 शाळा व अंगणवाडयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व मावळचे आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकासाधिकारी यांनी नुकसान पाहणी दौरा केला होता.

या पाहणी दौ-यात झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल ताबडतोब जिल्हा परिषदेकडे पाठवावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार अहवाल पाठविण्यात आले होते.

त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मोठा निधी मावळसाठी उपलब्ध केला आहे.

त्यानुसार तालुक्यातील टाकवे, बऊर, नवलाख उंब्रे, खडकाळा, कान्हे, इंदोरी, वडेश्वर, माळेगाव, खांडी यासह 83 शाळांच्या दुरूस्तीसाठी 1 कोटी 32 लाख 75 हजार तर वडगाव, बऊर, साते, खडकाळा, आंबी, वराळे, नाणेसह 27 अंगणवाडयांच्या दुरूस्तीकरीता 34 लाख निधी मंजूर झाल्याची माहिती वायकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.