Nepal Police Fire: चीननंतर नेपाळ सीमेवर तणाव; बिहारी नागरिकांवर नेपाळ पोलिसांचा गोळीबार, एक ठार

1 Indian Killed, 2 Injured In Firing By Nepal Guards Near Bihar Border नव्या नकाशात भारतीय राज्य उत्तराखंडातील लिपुलेख, काला पानी व लिम्पियाधुरा ही गावे नेपाळच्या नकाशात दाखवल्याने बिहारमध्ये नेपाळसोबत नवाच वाद निर्माण झाला आहे.

एमपीसी न्यूज- बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील जानकीनगर येथे शुक्रवारी (दि.13) सकाळी गावकरी व नेपाळ पोलिसांत हिंसक संघर्ष झाला. यावेळी नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक तरुण ठार झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

नेपाळी पोलिसांनी लगन यादव या भारतीयास अटक करून आपल्यासोबत पकडून नेले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीतामढी जिल्ह्यातील लगन राय यांची पत्नी आईला भेटण्यासाठी नेपाळच्या लालबंदी सीमेवर गेली होती. दरम्यान, दोन्ही नातेवाईक बसून आपसात बोलत होते. तेवढ्यात एक नेपाळी पोलिस तेथे आला आणि त्यांनी तेथून जाण्यास सांगितले.

यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी आजूबाजूचे शेकडो गावकरी तेथे आले. गावकरी व नेपाळच्या सशस्त्र दलात चकमक झाली. यानंतर नेपाळी पोलिसांनी लाठीमार केला.

त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. यात विकेशच्या (22) छातीत गोळी लागली. तो जागीच ठार झाला. तर उमेश राम (18) व उदय शर्मा (24) हे दोघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळ बिहारच्या सीतामढी जिल्ह्यालगत आहे. नव्या नकाशात भारतीय राज्य उत्तराखंडातील लिपुलेख, काला पानी व लिम्पियाधुरा ही गावे नेपाळच्या नकाशात दाखवल्याने बिहारमध्ये नेपाळसोबत नवाच वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात नेपाळमध्ये स्थानिक लोकांची घुसखोरी झाल्याचे नेपाळी पोलिसांनी म्हटले आहे. नेपाळने या भागात 14 जूनपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.