Pune : पुणे विमानतळावरुन तस्करीचे 1 किलो सोने जप्त

एमपीसी न्यूज – दुबईहून आलेल्या प्रवाशाने आपल्या दोन्ही गुडघ्याला बसविलेल्या नी कॅपमधून 28 लाख 30 हजार 500 रुपयांची 925 ग्रॅम गोल्ड पावडर तस्करी करुन आणल्याचे सीमा शुल्क विभागाने उघडकीस आणले आहे. मोहमद साफीर उमर सोबार (चेन्नई, तामिळनाडू ) असे या प्रवाशाचे  नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत आहे.

शनिवार दिनांक 4 ऑगस्टला मोगम्मद चेन्नईहून दुबईला गेला होता. काल रविवारी 5 ऑगस्टला तो पुन्हा दुबईतून स्पाईस जेट या विमानाने पुण्यामध्ये आला. त्याच्या  दोन्ही गुडघ्याला नीकॅप लावलेली होती, त्यामुळे विमानतळावर  पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यात चार पॅकेट आढळून आली. पॉलिमर आणि प्लॅस्टिसायजर याच्या सहाय्याने त्याने गोल्ड पावडर तयार केली होती. तर दुसऱ्या एका घटनेत सीमा शुल्क विभागाने त्याच विमानाने  बेकायदेशीरपणे आणलेल्या  1 लाख 64 हजार 200 सिगारेटचे 821 बॉक्स जप्त  केले आहेत. पुणे विमानतळावर 7 अफगाणी नागरिकांनी त्यांच्या बॅगेत परदेशी कंपनीच्या सिगारेट आणल्या होत्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन या सिगारेट जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचे उपायुक्त भारत नवले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.