Lonavala : आयएनएस शिवाजी जवळील दरीत कार कोसळून 1 जण ठार; तीन जखमी

एमपीसी न्यूज – लोणावळा लायन्स पॉईंट मार्गावरील आयएनएस शिवाजी समोरील डोंगराच्या नागमोडी रस्त्यावरुन पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील कार सुमारे दिडशे फुट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात कारमधील एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.

मनिष रमेश प्रितवाणी (वय 25, रा. खारघर, मुंबई) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. लोणावळा ते लायन्स पाॅईट दरम्यानच्या मागावर चढउतार व तीव्र वळणे आहेत. लायन्स पाॅईट परिसरात रात्री उशिरा फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गाडीला माघारी येताना हा अपघात झाला. चालकाला मार्गावरील वळण न दिसल्याने गाडी थेट दरीत पडली.  यामध्ये मनिष याचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

या अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस पथक व शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. रोहीत वर्तक, योगेश उंबरे, राजेंद्र कडु, आनंद गावडे, समिर जोशी, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, अशोक उंबरे, प्रविण देशमुख, महेश मसणे, राजु पाटील, वैष्णवी भांगरे, दिनेश पवार, साहेबराव चव्हाण, अभिजित बोरकर सुनिल गायकवाड यांनी घटनास्थळाचा शोध घेत दरीत शोध मोहिम राबवत पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास सर्वांना दरीतून बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.