India Corona Update : देशात 1 लाख 10 हजार 133 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 549 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 9 हजार 868 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट होत असून, सध्या 1 लाख 10 हजार 133 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 55 हजार 431 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 77 हजार 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.33 टक्के एवढा झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 488 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 67 हजार 468 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 63.71 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 120.27 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.