_MPC_DIR_MPU_III

India Corona Update : वाढता वाढे ! गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 31 हजार 968 नवे कोरोना रुग्ण

0

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 31 हजार 968 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 780 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 30 लाख 60 हजार 542 एवढी झाली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 61 हजार 899 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 91.21 टक्के एवढा झाला आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची 9 लाख 79 हजार 608 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 780 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 67 हजार 642 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.28 टक्के एवढा आहे‌.
_MPC_DIR_MPU_II
देशात आजवर 25 कोटी 40 लाख 41 हजार 584 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 13 लाख 64 हजार 205 चाचण्या गुरुवारी (दि.08) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 9 कोटी 43 लाख 34 हजार 262 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment