Pune Division news: पुणे विभागातील 1 लाख 38 हजार 755 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

1 Lakh 38 thousand corona patients cured from Pune DIvision.

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 1 लाख 38 हजार 775  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 93 हजार 355 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   49 हजार 457  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5  हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण   2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

शनिवारी (दि. 22) रात्री 9 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4  हजार 587  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात  3 हजार 280, सातारा जिल्ह्यात 361, सोलापूर जिल्ह्यात 323, सांगली जिल्ह्यात 319  तर कोल्हापूर जिल्ह्यात 304  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 9 हजार 62  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1  लाख  93 हजार 355  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1  लाख  42 हजार 461  रुग्णांपैकी 1  लाख 7  हजार 885  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31  हजार  221 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.73  टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 9  हजार 369 रुग्णांपैकी 5   हजार 550 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 523  आहे. कोरोनाबाधित एकूण 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15  हजार 494  रुग्णांपैकी 11 हजार 178  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3 हजार 661  आहे. कोरोनाबाधित एकूण  655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 8  हजार 295  रुग्णांपैकी 4  हजार 298 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3  हजार 704  आहे. कोरोनाबाधित एकूण 293  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  17 हजार 736  रुग्णांपैकी 9  हजार 864  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार  348 आहे. कोरोनाबाधित एकूण 524  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.