Pimpri: शहरात 1 हजार 133 नवीन रुग्णांची नोंद, 432 जणांना डिस्चार्ज तर 13 जणांचा मृत्यू

1 thousand 181 new patients were registered in the city, 432 were discharged and 13 died : शहरातील रुग्णसंख्या 18  हजार पार झाली असून 18 हजार 397 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1133 आणि शहराबाहेरील 48 अशा 1181 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 432 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 18  हजार पार झाली असून 18 हजार 397 वर पोहोचली आहे.

आज 13  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सांगवीतील 68 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 58 वर्षीय पुरुष, मोशीतील 65 वर्षीय महिला, चिंचवड येथील 95 वर्षीय वृद्ध महिला, काळेवाडीतील 72 वर्षीय पुरुष,  भोसरीतील 80 वर्षीय पुरुष, भोसरीतील 34 वर्षीय युवक,  रुपीनगर येथील 51 वर्षीय पुरुष,  ताथवडेतील 58 वर्षीय महिला, चिंचवड येथील 73 वर्षीय वाकड मधील 73 वर्षीय पुरुष आणि  देहुरोड येथील 75 वर्षीय वृद्ध महिला, फुरसुंगीतील 71 वर्षीय  पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 18 हजार 397 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 11962 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील  303 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 79 अशा 382 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या  3550  सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 5667

# पॉझिटीव्ह रुग्ण -1181

#निगेटीव्ह रुग्ण – 3982

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1260

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3530

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 4956

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -18,397

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3550

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -382

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -11,962

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24582

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 114026

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.