येत्या गुरुवारी सकाळी 10 वाजता होणार मत मोजणीला सुरुवात

एमपीसी न्यूज – महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे तर गुरुवारी (दि.23) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने  जाहीर केले आहे.
 
 

उद्या पुणे जिल्हा परिषद, मावळ पंचायत समिती  तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी मतदान होणार असून या मतदानाची मोजणी गुरुवारी सुरू होणार असून ती साकाळी दहापासून सुरू होईल, असे  राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी 11 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तर पुण्यामध्ये 14 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मत मोजणी होणार आहे. 
 

यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मतमोजणीसाठी सुमारे 3 हजार पोलीस 8 हजार कर्मचारी असणार आहेत.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.