Pune News : पुण्यात आरटीओ कार्यालयाच्या आवारातील 10 गाड्यांना आग

एमपीसी न्यूज – पुण्यातील विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ (Pune News) कार्यालयाच्या आवारामध्ये 10 गाड्यांना आग लागल्याची घटना आज (दि.15) दुपारी 1 च्या सुमारास आग लागली आहे. 

घटना स्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या  व दोन पाण्याचे टँकर दाखल झाले होते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्यात आले आहे.

.यामध्ये 4 कार, 4 लक्झरी बस, 1 टेम्पो व 1डंपर अशी एकूण 10 वाहने पेटली होती.यात कोणतीही जीवित हानी झाली नसून आगीचे करण मात्र कळू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.