Pimpri : डॉक्टरसह दहा जणांची कोरोनावर मात; बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज

10 covid19 patients including a doctor couple cured and discharged from Balewadi corona care centre cured

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी रुग बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. शहरातील मोशी, सांगवी, च-होलीतील दहा जणांनी आज (गुरुवारी) एकाच दिवशी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे.

त्यांना महापालिकेने तयार केलेल्या बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 152 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. महापालिकेच्या आठही प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहरातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आजपर्यंत शहरातील 245 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आजपर्यंत 152 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महापालिकेने बालेवाडी स्टेडीयम येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 300 बेडचा क्वारंटाईन वार्ड तयार केला आहे. याठिकाणी कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण त्यांना काहीच लक्षणे नाहीत अशा रूग्णांना ठेवले जाते.

या कोविड केअर सेंटरमधून आज दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनावर मात केलेल्यामध्ये मोशी परिसरातील डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा समावेश आहे.

या रुग्णांना डिस्चार्ज देताना महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like