Chinchwad News : थरमॅक्स चौकात रस्ता काँक्रीटीकरणासाठी 10 कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज  – थरमॅक्स चौक ते स्वामी विवेकानंद हॉलकडे जाणा-या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी 10 कोटी 45 लाख रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये थरमॅक्स चौक ते स्वामी विवेकानंद हॉलकडे जाणा-या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 11 कोटी 46 लाख रूपये दर निश्चित करण्यात आला. रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस वगळून 11 कोटी 37 लाख रूपयावर निविदा मागविण्यात आल्या.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार, पीसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 10 टक्के कमी म्हणजेच 10 कोटी 23 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 13 लाख 12  हजार रूपये आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस 9 लाख 14  हजार रूपये असा एकूण 10 कोटी 45  लाख रूपये दर सादर केला.

इतर ठेकेदारांपेक्षा दर कमी असल्याने पीसीसी इन्फ्रास्ट्रक्चर यांची निविदा स्विकृत करण्यास महापालिका आयुक्त यांनी 11 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.