१० डिसेंबर : दिनविशेष

What Happened on December 10, What happened on this day in history, December 10. See what historical events occurred, which famous people were born and who died on December 10.

१ डिसेंबर : दिनविशेष – मानवी हक्क दिन

१ डिसेंबर – महत्वाच्या घटना

  • १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.

    १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

    १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

    १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

    १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.

    २००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.

    २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    २०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.

१ डिसेंबर – जन्म

  • १८७०: इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९५८)

    १८७८: स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

    १८८०: प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)

    १८९२: मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ मार्च १९३७)

    १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.

    १९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.

१ डिसेंबर – मृत्यू

  • १८९६: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १८३३)

    १९२०: डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६८)

    १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)

    १९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)

    १९६३: इतिहास पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९५)

    १९६४: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)

    १९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)

    २००१: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९११)

    २००३: संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन.

    २००९: लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.