Uttarakhand Avalanche : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे 10 ठार, 19 अडकून पडले

एमपीसी न्यूज : उत्तरकाशीमध्ये हिमस्खलनामुळे 10 प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला आहे, तर 19 प्रशिक्षणार्थी अजूनही खड्ड्यांमध्ये (ग्लेशियरच्या मध्यभागी मोठ्या दरडीमध्ये) अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी निमच्या दिशेने बचाव मोहीम राबविण्यात येत होती. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, नेहरू पर्वतारोहण संस्था (NIM) 22 सप्टेंबरपासून डोक्राणी बामक ग्लेशियर येथे अॅडव्हान्स प्रशिक्षण घेत होते. 97 प्रशिक्षणार्थी, 24 प्रशिक्षक आणि निमचा एक अधिकारी अशा एकूण 122 जणांचा या प्रशिक्षणात सहभाग होता. तर 44 प्रशिक्षणार्थी आणि 9 प्रशिक्षकांसह एकूण 53 जणांचा अॅडव्हान्स अभ्यासक्रमात सहभाग होता.

प्रशिक्षणादरम्यान द्रौपदी दांडाजवळ हिमस्खलनामुळे 29 प्रशिक्षणार्थी खड्ड्यात अडकले. निमने द्रौपदी दांडा येथील खड्ड्यात अडकलेल्या आठ जणांची सुटका केली आहे, तर 21 जण अजूनही दरडीत अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी निमकडून बचावकार्य सुरू आहे.

त्याचवेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घटनेची माहिती दिली. त्यावर राजनाथ सिंह यांनी हवाई दलाला बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.