Pune Police : पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमीत्त दहा किमीची दौड

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमांतर्गत पुणे पोलीस व नागरिक यांची दहा किलो मीटरची (Pune Police) दौड रविवारी (दि.14) आयोजीत केली आहे. पुणे पोलीस व नागरिकांमधील सुसंवाद वाढावा, यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासांठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेमबाज खेळाडू अंजली भागवत, बजाज फिनसर्व्ह कंपनीचे टिम लिडर, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहा पोलीस आयुक्त, संदिप कर्णीक आदी उपस्थित राहणार आहेत.

Maval : गडकिल्ले परिसरात गुटखा व सिगारेट विक्रीवर बंदी आणण्याची मागणी

ही दौड सकाळी सहा ते आठ या दोन तासाच्या कालावधीत पार पडणार आहे. याची सुरूवात शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथून सुरु होऊन कृषी महाविद्यालय गेट जवळील चौकातून सिमला ऑफीस, जंगली महाराज रोड, संभाजी पूलावरून गुडलक चौक पुढे बीएमसी रोडवरून सिम्बॉयसीस कॉलेज, पत्रकार चौक त्यानंतर सेल पेट्रोलपंपापासून पुन्हा पोलीस मुख्यालय अशी होणार आहे. यासाठी जागोजागी पोलीस ठाणे व वाहतूक पोलीस यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयाचे 600 पोलीस , ब्ल्यू ब्रिगेड या आरोग्य विषयक टिमचे 50 समन्वयक सहभागी होणार आहेत. यावेळी सहभागी नागरिकांना टिशर्ट, प्रमाणपत्र, मेडल देण्यात येणार असून स्पर्धेत प्रथम येणाऱ्या तीन क्रमांकाना प्रमाणपत्र, मेडल व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

यासाठी पुरुष गटात व महिला गटात तीन वेगवेगळे क्रमांक काढण्यात येतील. विजयी खेळांडून त्याच वेळी बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या उपक्रमात जास्तीत-जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.