Sangvi : पिंपळे गुरवमध्ये दहा मिनिटात दहा लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – घराच्या अर्धवट उघड्या दरवाजातून आत घुसून अज्ञात चोरट्यांनी 10 लाख 5 हजार 706 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी 6 ते 6.10 च्या सुमारास घडली. केवळ दहा मिनिटांच्या कालावधीत चोरट्यांनी संपूर्ण तिजोरीवर हात साफ केला.

सारिका संदीप वीटकर (वय 33, रा. धोत्रे चाळ, भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटकर यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाजवळ त्या कपाटाची चावी होती. त्या चावीच्या साहाय्याने कपाट उघडून कपाटातील 10 लाख 5 हजार 706 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दहा मिनिटांच्या कालावधीत चोरट्याने संपूर्ण तिजोरी साफ केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.