Alandi News : आळंदीत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये हॉकी स्टिकसह दहा लाखांची रोकड मिळाल्याने खळबळ

एमपीसी न्यूज : आळंदी येथे रविवारी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये हॉकी स्टिकसह दहा लाखांची रोकड आढळून आली यामुळे एकच खळबळ उडाली.(Alandi News) दिघी-आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओवर मॅगझिन चौक येथे कारवाई केली.

 

Pune : राज्यातील 21 जिल्ह्यात निवडणूक साक्षरता मंच उपक्रम सुरू करणार – श्रीकांत देशपांडे

 

या गाडीचा संशय आल्याने ती गाडी तिथे त्यांनी थांबवली. त्या गाडीवर दिवा लावण्यात आलेला होता.  गाडीत दोन हॉकी स्टिक ,दहा नंबर प्लेट व दहा लाख रुपये रोख रक्कम सापडली.(Alandi News) सदरची गाडी जप्त करून  चालकाला ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांची रवानगी दिघी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. तसेच काल  अनेक गाड्यांवर दिघी- आळंदी वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.