Dehu Cantonment Corona Update : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 10 नवे रुग्ण, एकाला डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 10 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, बरे झालेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. हद्दीत सध्या 156 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने बुधवार (दि.19) सायंकाळी कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. बुधवारी सापलेले दहा रुग्ण थॉमस कॉलनी (1),पोर्टर चाळ (3), दत्तनगर (1),संकल्प नगरी (2) युनिक, क्लासिक सोसायटी, एल्लोरा सोसायटी (1), चिंचोली (1), वृंदावन सोसायटी (1)येथील आहेत. हद्दीत आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

हद्दीत आजवर 2 हजार 664 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 448 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. हद्दीत आजवर 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हद्दीत 156 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 27 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 91 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर, 38 रुग्णांवर एमबी स्कूल कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.