Lonavala : एक्सप्रेस वे वर बस व कंटेनर अपघातात 10 जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील सिंहगड काॅलेज समोर मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास बस व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात बसमधील 10  प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

भरधाव वेगातील बस समोर जाणार्‍या कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींवर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.