Pune : खासदार काकडे यांनी पोलिसलाईनमध्ये पाठविले पाण्याचे 10 टँकर

पोलिसलाईनमधील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुण्यात येताच संबंधितांची भेट घेणार -  संजय काकडे

एमपीसी न्यूज – शिवाजी नगर पोलीस वसाहतीत गेल्या 4-5 दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील नागरिक पुरते मेटाकुटीला आले आहेत. आज ( रविवार ) संतप्त झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी थेट हंडा घेऊन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावरच मोर्चा काढला. तर दुसरीकडे पोलीस वसाहतीत रस्ता रोको देखील केला. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

दरम्यान, त्याआधीच खासदार संजय काकडे यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये 10 पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहेत. जोपर्यंत पोलीस लाईनमधील पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत दररोज पाण्याचे 10 टँकर पाठविले जाणार आहेत. तसेच, पोलिसलाईन मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी संबंधितांची लवकरच भेट घेणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले आहे.
पुणेकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर व त्यांच्या कुटुंबियांवर पाण्यासाठी वणवण भटकायची वेळ आलीय, हे दुर्दैवी आहे असल्याचं मत संजय काकडे यांनी व्यक्त केलं आहे. खासदार संजय काकडे हे पुण्यात नाहीत. त्यांना पाोलिसलाईनमधील पाणी टंचाईची माहिती मिळताच खासदार काकडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून पाण्याचे 10 टँकर पोलिसलाईन मध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. पोलिसलाईनमधील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुण्यात येताच खासदार संजय काकडे संबंधितांची भेट घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.