10 th Result : विद्येच्या माहेर घराला मागे टाकत 100 टक्के गुण मिळवण्यात लातूर पॅटर्न ठरला सरस

एमपीसी न्यूज – यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत 100 टक्के गुण मिळवण्यात (10 th Result )लातूर पॅटर्न सरस ठरला असून त्याने पुण्याला देखील मागे टाकले आहे.राज्यात एकूण 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यातील 108 विद्यार्थी हे एकट्या लातूर विभागातील आहेत. त्यामुळे लातूर पॅटर्न यंदा ही गाजला आहे.
महाराष्ट्र उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेत दहावी मार्च 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात त्यांनी राज्यात 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील सांगितली आहे. एकूण 151 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
यात विभाग निहाय पाहिले गेले तर लातूर विभागात 108, त्या खालोखाल औरंगाबाद विभागात 22, अमरावती विभागात 7, मुंबई विभागात 6, त्यानंतर पुण्यात 5 v कोकण विभागात 3 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मिळवण्यात यश मिळवले आहे.तर या बाबतीत नाशिक व नागपूर यांनी खातेच उघडलेले नाही.
तर राज्यात 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत 66 हजार 578 विद्यार्थी हे पास झाले आहेत. याबरोबरच 85 ते 90 टक्के मध्ये 1 लाख 9 हजार 344 विद्यार्थी पास झाले आहेत. तर खालून पहिला क्रमांक मिळवणाऱ्या मध्ये म्हणजे 45 टक्के पेक्षा कमी गुण मिळवत काठावर पास झालेल्यांची संख्या 95 हजार 469 एवढी आहे.
विभागीय आकडेवारीत पास विद्यार्थी असलेल्या जिल्ह्यांची टक्केवारी काढली तर सिंधुदुर्ग,रत्नागिरी व कोल्हापूर यांनी बाजी मारली आहे.यात सिंधुदुर्ग 98.54 टक्के, रत्नागिरी 97.90 टक्के व कोल्हापूर 97.21 टक्के असा निकाल (10 th Result ) लागला आहे.