Mulshi : मुळशी धरणातून 10 हजार क्युसेक्स विसर्ग

एमपीसी न्यूज – धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरणातून आज रात्री दहा वाजल्यापासून 10 हजार क्युसेक्स वेगाने  विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

आज सायंकाळी चार वाजल्यापासून पाच हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर त्यात अनुक्रमे आठ व रात्री दहानंतर वाढ करण्यात आली. रात्री आठ वाजता सात हजार 500 क्युसेक्स तर रात्री दहा नंतर 10 हजार क्युसेक्स ने वाढ करण्यात आली. ही वाढ रात्रभर स्थीर राहणार आहे, अशी माहिती टाटा पॉवर धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.