Pune : पांचाळेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून 10 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज –  मंदिरातील दानपेटी फोडून 10 हजारांची चोरी केल्याची घटना काल सोमवारी(दि.22) पहाटे 4 च्या सुमारास पांचाळेश्वर मंदिरात घडली.

याप्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक विजय हाडके (वय 69, रा. डेक्कन जिमखाना) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील पांचाळेश्वर मंदिरातील दानपेटी तीन अज्ञात इसमांनी उचकटून त्यातील भाविकांनी दान केलेली एकूण 10 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.