Pune News: बॅडमिंटनचे फुल काढत असतांना विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने 10 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणी काळभोर मध्ये असलेल्या कदमवावस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती मधील घटना असून भाग्यश्री धनाजी बनसोडे (10), असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मागील रविवारी घऱाच्या टेरेसवर बॅडमिंटन खेळत होती. या वेळी बॅडमिंटनचे फुल टेरेसच्या दुसऱ्या बाजुला पडले. ते काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीवर गेली होती. टेरेसवरुन गेलेल्या विजवाहक तारांच्या खाली चार फुट उंचीची भिंत असल्याने शिडीच्या साह्याने फुल काढत असताना, ती विज वाहक तारांच्या संपर्कात आली.

Pune News: पाण्याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे – डॉ. सुहास वाणी

हा झटका इतका तीव्र होता की त्यात ती 50 टक्के भाजली गेली. स्थानिकांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मागील दिवसापासुन मृत्युशी चाललेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली

भाग्यश्री ही तिच्या कुटुंबीयांसह महादेव खंदारे यांच्या घरात भाड्याने राहिला होती. बिल्डींग उभी असलेल्या जागेतून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. विज वितरण कंपनीने खंदारे यांनी याआधी देखील तारांच्या खाली इमारत बांधु नये याबाबत लेखी कळवले होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.