Pune : पोटच्या मुलाच्या डोक्यात बॅट मारुन जीवे मारणाऱ्या आईस 10 वर्षांची सक्तमजुरी.

एमपीसी न्यूज – अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या अपंग मुलाच्या डोक्यात बॅट मारुन हत्या करणाऱ्या आईला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भयसारे यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ऑगस्ट 2015 मध्ये घडली होती.
राखी बालपांडे (वय 36) असे खून करणा-या आईचे नाव आहे. चैतन्य तरुण बालपांडे(वय 13) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

चैतन्य हा अपंग होता त्यामुळे तो नेहमी घरातच राहत होता. त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर न्यायालयाने चैतन्याचा ताबा आई राखीकडे देण्यात आला होता. परंतु त्याची आई राखी बालपांडे चैतन्य अपंग असल्यामुळे व त्याचा प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी चैतन्यच्या आईने व प्रियकराने त्याच्या डोक्यात बॅट मारून त्याची निर्घृण हत्या केली.न्यायालयाने आई राखी हिला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अखेर 3 वर्षांनंतर चैतन्यला न्याय मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.