Shivai Bus : मुंबई-पुणे मार्गावर धावणार पर्यावरणपूरक 100 शिवाई बस

एमपीसी न्यूज  : मुंबई-पुणे मार्गावर नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने या मार्गावर लवकरच 100 शिवाई बस धावणार आहेत. (Shivai Bus) येत्या दोन महिन्यात महामंडळाच्या ताफ्यात जवळपास 150 इलेक्ट्रॉनिक बस दाखल होणार आहे. या मार्गावरील बस फेऱ्या वाढल्याने महामंडळाचे उत्पन्न देखील वाढणार आहे. दरम्यान या मार्गावर सध्या सुरू असलेल्या शिवनेरी बस या टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहे.

केंद्राच्या फेम 2 योजने अंतर्गत 150 इलेक्ट्रिक बस गाड्या या महामंडळाला मिळणार आहेत. या गाड्या ठाणे-पुणे, दादर-पुणे, नाशिक-पुणे, कोल्हापूर-स्वारगेट, औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवर धावणार आहेत. या पर्यावरण पूरक बसचे मुंबई-पुणे प्रवासाचे भाडे हे 350 रुपये राहणार आहे.

यामुळे प्रवासाचा खर्च कमी होणार असून पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी या वातानानुकुलीत बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना 440 ते 500 रुपये भाडे द्यावे लागते. मात्र, शिवाई बसमुळे पैशांची देखील बचत होणार आहे.

शिवाई’ बसेस  या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, (Shivai Bus) त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

गेल्या वर्षी 1 जुन रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक शिवाई बस धावली होती. तिची चाचणी यशस्वी झाली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बसचे लोकार्पण केले होते. पुणे- नगर मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरु केल्यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.