Pimpri : केरळमध्ये मदतकार्यासाठी 100 हुन अधिक निरंकारी सेवादल रवाना

एमपीसी न्यूज –  निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आदेशाप्रमाणे 23 ऑगस्ट 2018 पासून संत निरंकारी मिशन चे सेवादल, संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक तसेच डॉक्टर, इलेक्टरीशीयन, गवंडी, प्लंबर, कारपेंटर 10 सप्टेंबर 2018 पर्यंत मदत कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. 3 सप्टेंबर रोजी 100 सेवादलाचे पथक मंडळाचे पुणे क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी यांच्या बरोबर केरळला रवाना झाले.

उत्तराखंड येथील प्रलयाच्या वेळी हि मंडळाने मदत कार्य निस्वार्थ भावनेने करून जनसेवा हीच ईश्वर सेवा याची शिकवण दिली आणि हेच संत निरंकारी मंडळाचे प्रतीक आहे. माळीण या ठिकाणी पोहोचून देखील संत निरंकारी मंडळाद्वारे याच प्रकारची जनसेवा करण्यात आली होती. जेव्हा हि नैसर्गिक आपत्ती समाजात निर्माण होते तेव्हा निरंकारी सेवादल त्या ठिकाणी जाऊन आपली निष्काम सेवा निभावत असतात. पुण्यातून गेलेले सेवादल चे पथक 10 सप्टेंबर पर्यंत ही सेवा देतील. या पथकाबरोबर ब्लँकेट्स, कपडे यांसारख्या इतर दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक वस्तू मंडळाच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत असे निरंकारी फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.