SSC Result : दहावीत 31 पैकी 13 विषयांचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC Result)  शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता दहावी) निकाल शुक्रवारी (दि. 2) जाहीर झाला. ही परीक्षा 31 विषयांसाठी घेण्यात आली. त्यातील 13 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

Moshi : मोशीमधील गंधर्व नगरीत दररोज आठ तास वीज गायब

हिंदी (प्रथम भाषा), गुजराती (द्वितीय भाषा), फ्रेंच, फिजोलॉजी हायजीन अँड होम सायन्स, हिंदी-कन्नड, हिंदी-सिंधी, सेल्फ डेव्हलपमेंट, वॉटर सिक्युरिटी, मल्टी स्किल असिस्टंट टेक्नॉलॉजी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन, स्टोअर ऑपरेटर असिस्टंट, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, टुरिजम अँड हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर या विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

गुजराती (प्रथम भाषा) या विषयाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या विषयाचा निकाल 92.31 टक्के लागला आहे. इंग्रजी (प्रथम भाषा), उर्दू (प्रथम भाषा), मराठी (द्वितीय भाषा), संस्कृत (द्वितीय भाषा), अंकगणित, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, हिंदी-संस्कृत या आठ विषयांचा निकाल 99 टक्के लागला आहे.

मातृभाषेचा निकाल 97 टक्के
महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी विषयाचा निकाल 97.43 टक्के लागला आहे. या विषयासाठी एक लाख 13 हजार 14 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील एक लाख 12 हजार 662 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक लाख नऊ हजार 764 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन हजार 898 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.