Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे स्कूलचा याही वर्षी 100 टक्के निकाल; दोघांना मिळाला प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल यावर्षी देखील 100 टक्के लागला आहे. जगन रवींद्र पांडा आणि श्रावणी नवनाथ भंडलकर या दोघांना 94.40 टक्के गुण मिळाले आहेत. दहावीच्या वर्गात दोघांचा पहिला क्रमांक आला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च 2023 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळून यश संपादन केले. या परीक्षेस शाळेचे एकूण 59 विद्यार्थी बसले होते. यामध्ये जगन रविंद्र पांडा याने  व  श्रावणी नवनाथ भांडलकर हिने ही 94.40 टक्के गुण मिळवून दोघांनीही प्रथम क्रमांक पटकावला.
तर 94 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक उन्नती ठाकूर, तिसरा क्रमांक कु.श्रृती राजेंद्र झावरे  गुण 91.60 टक्के, समृद्धी धनंजय दाभाडे चौथा क्रमांक गुण 91.40 टक्के, तर 91 टक्के गुण मिळवून स्वाती ओमप्रकाश कोरी हिने पाचवा क्रमांक पटकावला. शाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे शाळेचे संस्थापक चंद्रकांत  काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व शाळेचे सर्व शिक्षक यांनी  कौतुक व अभिनंदन केले व  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.