SSC Result 2022 : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result 2022) 100 टक्के लागला. 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील स्कूलने कायम राखली आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेतील एकूण 74 विद्यार्थी बसले होते. त्यातील सगळेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. दहावीचा शुक्रवारी (दि. 17) ऑनलाईन निकाल जाहीर झाला.

शुक्रवार, (दि. 17 जून) तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सन 2021 – 22 या वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (SSC Result 2022) आज जाहीर झाला. कोरोना काळात झालेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे यावर्षीच्या दहावीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती, परंतु तरीही सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालूच होते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून याहीवर्षी शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत बाजी मारली.

Youth Stabbed : पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार

या बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेतील एकूण 74 विद्यार्थी बसले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. हे सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पास झाले. एकूण 74 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले , तर 52 विद्यार्थी 80% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले. तसेच 7 विद्यार्थी हे 70% पेक्षा जास्त गुण मिळवून पास झाले. या विद्यार्थ्यांमध्ये कु. ढोरे श्रेया नितीन ही विद्यार्थिनी 96.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. कु. पाटील सौरभ दिलीप हा विद्यार्थी 95 टक्के गुण मिळवून द्वितीय आला , तर कु.भसे अनुज संतोष हा विद्यार्थी 94.40 टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय आला. केदारी हर्षद पांडुरंग 93 टक्के, गायकवाड दर्शन देविदास 92.40 टक्के, कु. भेगडे दिया नंदकुमार 92.20 टक्के , श्रावणी दीपक ढोरे 92% गुण मिळवून, यांनी अनुक्रमे चौथा , पाचवा , सहावा व सातवा क्रमांक पटकाविला.

Jammu Kashmir Killings : पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची हत्या, घरात घुसून गोळीबार

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, तसेच संस्थेचे इतर सभासद व सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे खूप खूप अभिनंदन केले. कोरोनाच्या कालावधीत देखील या सर्व विद्यार्थ्यांची अतिशय जोरदार तयारी करून हे यश संपादन केले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.