Talegaon Dabhade : विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या तरुणावरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील खाउगल्लीमध्ये पावभाजीचा व्यवसाय करणारा तरुण प्रसाद सोन्या जाधव (वय 28) हा विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याच्यावरील उपचारासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

प्रसाद सोन्या जाधव याचे नुकतेच लग्न झाले आहे. शुक्रवारी (दि. 31 मे ) विवाहनिमित्त घरामध्ये आयोजित केलेल्या पूजेच्या वेळी प्रसाद हा विजेच्या खांबावर अडकलेला बॅनर काढण्यासाठी खांबावर चढला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये तो 40 फूट उंचीवरून खाली डांबरी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत तो 60 टक्क्यापेक्षा अधिक भाजला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याच्यावरील उपचाराचा खर्च या कुटुंबाला पेलवणार नाही. त्यामुळे तळेगावकर नागरिकांनी प्रसादवरील उपचारासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करावी असे आवाहन प्रदीप नाईक यांनी केले आहे. आर्थिक मदत देण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा

https://milaap.org/fundraisers/support-prasad-jadhav?utm_source=whatsapp&utm_medium=fundraisers-title&mlp_referrer_id=1677271

पे टीएम द्वारे मदत देण्यासाठी (for Android users only) – http://m.p-y.tm/pay-milaap?comment=originId_82115&amount=2500&amount_editable=1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.