Chinchwad : प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांकडून वीस हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – प्लास्टिक बंदी असतानादेखील प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. थेरगांव फाटा ते आनंद पार्क, गणेशनगर परिसरात कारवाई करून दुकानदारांकडून वीस हजार तीनशे वीस रुपयांचा दंड वसूल केला आहे. जागतिक पर्यावरण दिवस निमित्त बुधवारी (दि. 5) धडक मोहीम राबविण्यात आली.

त्याचप्रमाणे डांगेचौक ते वाकड रोडपर्यंत साफसफाई करुन कचरा उचलण्यात आला. डांगेचौक आणि गणेश नगर, शिवकाॅलनी येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच नागरिकांना ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा पाणी जिरवा’, ‘प्लास्टिक पिशव्या वापरु नये’, ‘रस्ता वर कचरा फेकु नये’ असा संदेश देणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी व मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एन.बेद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.