Pune : दहावीचा निकाल 77.10 टक्के ! यंदा टक्का घसरला !

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यान्चाच्या परीक्षेत 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या 12.31 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे, 88.38  टक्के लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी 67.27 टक्के लागला आहे. निकालामध्ये यंदा पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे.

विभागीय मंडळ निहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- पुणे- 82.48, नागपूर- 67.27, औरंगाबाद- 75.20, मुंबई- 77.04, कोल्हापूर- 86.58, अमरावती- 71.98, नाशिक- 77.58, लातूर- 72.27, कोकण- 88.38

राज्यातील 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यात लातूरमधील 16, औरंगाबादेतील तीन व अमरावतीतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. 25 हजार 941 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.