Bangluru : प्रख्यात अभिनेते डॉ. गिरीश कर्नाड यांचे निधन

एमपीसी न्यूज- नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक डॉ. गिरीश कर्नाड (वय 81) यांचे आज सोमवारी प्रदीर्घ आजाराने बंगळुरू येथे आज सकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड आजारपणाशी झुंज देत होते. आज सकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अंतर्मुख करणारे लेखन, कुशल दिग्दर्शन आणि संयत अभिनय साकारणारा कलाकार हरपला अशी भावना नाट्यचित्रपट वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयानं रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. जब्बार पटेल यांच्या उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.