BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : तरुणाला धमकावून एटीएम मधून 60 हजार रुपये काढले

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाला धमकावून एकाने त्याच्या एटीएम कार्डद्वारे 60 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेआठच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम समोर घडली.

तेजस हरिहर पटेल (वय 26, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात स्कूटर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम समोरून पायी चालत जात होते. त्यावेळी स्कूटरवरून एक जण आला. त्याने तेजस याला शिवीगाळ करत ‘तू माझ्या गाडीचा अपघात केला, तुला बघून घेतो’ असे म्हणून तेजसच्या एटीएम कार्डद्वारे साठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

.