Wakad : अंगावर लघुशंका करणा-यास रोखल्याने ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – अंगावर लघुशंका करणाऱ्यास रोखल्याने ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री साडेबाराच्या सुमारास वाकड येथे घडला.

शिवमूर्ती जाकते (वय 65, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुलगा किरण जाकते (वय 23) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी उर्फ विकास अडागळे (रा. म्हातोबानगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण यांचे वडील शिवमूर्ती यांना घरात उकडत असल्याने ते सोमवारी रात्री घरासमोर झोपले होते. दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी अडागळे त्यांच्या अंगावर लघुशंका करू लागला. त्यामुळे शिवमूर्ती खडबडून जागे झाले. त्यांनी अडागळे याला अंगावर लघुशंका करण्यास मनाई केली व याबाबत जाब विचारला. त्याचा राग आल्याने अडागळे याने जवळील कोयत्याने त्यांच्या डोक्यात सपसप वार केले. शिवमूर्ती यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा व पत्नी बाहेर आले. नागरिक जमा झाल्याचे पाहून अडागळेने तेथून पळ काढला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.