Vadgaon Maval : पंढरपुर पायी वारी दिंडीचा शुक्रवारी सन्मान सोहळा

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री पोटोबा देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पंढरपूरला जाणाऱ्या दिंडयांचा ताडपत्री देऊन कामगार, पुनर्वसन व पर्यावरण राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्री पोटोबा देवस्थानचा अहवाल प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, संचालक माऊली दाभाडे, माऊली शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, तालुका अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष नरहरी केदारी, आदींसह तालुक्यातील वारकरी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याबद्दल व खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे पुन्हा खासदार झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच निष्ठावंत वारकरी पुरस्कार भगवान महाराज लोखंडे यांना तर अनंता कुडे यांना कर्तव्यदक्ष सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती वारकरी संप्रदायाचे सचिव गणेश जांभळे व देवस्थान चे विश्वस्त किरण भिलारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.