Alandi : अलंकापुरीत पालखी सोहळ्यासाठी सर्जा – राजा सज्ज

एमपीपीसी न्यूज – माऊलींच्या वैभवी रथास या वर्षी येथील मानकरी पंडीत रानवडे यांची बैलजोडी जुंपण्यात येणार आहे. या बैलजोडीची  वैद्यकीय तपासणी नुकतीच करण्यात आली. तपासणीने श्रींच्या सोहळ्यास सर्जा-राजा बैलजोडी सज्ज झाली आहे. 

माऊलींच्या वैभवी पालखीरथास जोडल्या जाणा-या सर्जा-राजाची वैद्यकीय तपासणी पशुसंवर्धन विभाग पुणे अंतर्गत खेड पंचायत समितीच्यावतीने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, माधुरी विधाटे, डॉ. ज्योती माने, डॉ. दिपा कोठुळे, रामदास गिलबिले, प्रदीप सोनवणे यांच्या वैद्यकीय पथकाने केली.  श्रींच्या रथास सर्जा- राजा जुंपण्यास सज्ज असल्याचे प्रमाणपत्र तपासणीनंतर देण्यात आले. यावेळी सेवेचे मानकरी शैलेश रानवडे, राहूल चिताळकर आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर महाराज यांच्या चांदीच्या पालखीरथास बैलजोडी सेवा देणारे राजाच्या आरोग्यागाची काळजी घेण्यास सूचना व वैद्यकीय सल्ला, माहिती देण्यात आली. तसेच औषधोपचार, खुराक, चारा – पाण्याची व्यवस्था आदींची माहिती घेण्यात आली. सर्जा-राजाला आवश्यक महिन्याभरासाठी औषधांचे किट सेवेचे मानकरी रानवडे परिवारास सुपुर्द करण्यात आले. सर्जा-राजाची पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी नियमित तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. दीपा कोठुळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.