Pune : मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस 6 कोटी 26 लाख नफा

सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची माहिती

एमपीसी न्यूज- दि मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस 2018-19 या आर्थिक वर्षात 6 कोटी 26 लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.

बँकेची 87 वी सर्वसाधारण सभा आझम कँम्पस असेंब्ली हॉल येथे रविवार दि. 23 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

बॅंकेकडे 583 कोटी 62 लाख रुपये ठेवी असून 342 कोटी 67 लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए 9 टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एनपीए कमी करण्यात यश मिळाले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात 6 कोटी 26लाख रुपये फायदा झाला आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या मुस्लीम को- ऑप बँकेच्या राज्यात ‌26शाखा असून महाराष्ट्रात विविध शहरात शाखाच्या विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे. मोबाईल बँकिंग अॅप, आरटीजीएस- एनईएफटी गो लाईव्ह या डिजीटल बँकिंग सेवा देण्यात आल्या असून भावी काळात अत्याधुनिक बँकिंग सेवा दिल्या जाणार आहेत.

बँकेचे संचालक, सभासद,कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते, सभेनंतर ‘ सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम ‘ घेण्यात आला. त्यात आधुनिक बँकिंग प्रणालीची माहिती देण्यात आली.

बँकेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार ,सचिव डॉ.हारुन सय्यद यांनी अहवाल मांडला. त्याला सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1