Bhosari : वाट अडवून तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – जिममधून घरी जात असेलेल्या तरुणीची एकाने वाट अडवली. तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

रुषी जमदाडे (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी इंद्रायणीनगर येथील एका जिममध्ये जाते. ती शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जिममधून घरी जात होती. रस्त्यात आरोपीने तरुणीला गाठले. गाडी आडवी लावून तरुणीला थांबवले. ‘माझा नंबर अनब्लॉक कर, मला तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच तरुणीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.