Pimpri: संदीप वाघेरे युवा मंचातर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

गुणवंत विद्यार्थ्यांचा 'लॅपटॉप' देऊन गौरव

एमपीसी न्यूज – संदीप वाघेरे युवा मंचातर्फे प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे तीन हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते दहावीत 95.20 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला प्रथमेश लोहार, रितिका यादव 94 टक्के हिचा ‘लॅपटॉप’ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर, 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांचा पॅनड्राईव्ह व टॅब देऊन गौरव करण्यात आला.

पिंपरीत झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला नगरसेवक संदीप वाघेरे, शिवव्याख्याते अ‍ॅड.रवींद्र यादव, माजी नगरसेवक संतोष कुदळे, चंद्रकांत गव्हाणे, पंडित कापसे, शिवाजी वाघेरे, बन्सी नाणेकर, रामभाऊ कुदळे, रंजना जाधव आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 21 मधील गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. दहावीत 95.20 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला प्रथमेश लोहार, रितिका यादव 94 टक्के हिचा ‘लॅपटॉप’ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर, 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांचा पॅनड्राईव्ह व टॅब देऊन गौरव करण्यात आला. करण अंकुश अंबाड व साक्षी प्रशांत अमृतकर या दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला सेवाभाव वृत्तीने झकाळी दिल्याबाबत पिंपरीगावचे व्यापारी घनशाम वर्मा यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध शाहीर जालिंदर शिंदे आणि त्यांचे सहका-यांचा पोवाड्याचा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, राजेंद्र वाघेरे, किरण वाघेरे, रोहित लालगे, शरद कोतकर, शुभम शिंदे, किरण शिंदे, आकाश चव्हाण, विठ्ठल जाधव, दीपक मुंगसे, स्वाती गायकवाड, अपूर्वा खोचाडे, प्रिती गायकवाड, रोहन वाधवाणी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.