_MPC_DIR_MPU_III

Maharashtra Corona Update : आज राज्यात 10 हजार 300 नवे रुग्ण, 10 हजार 900 रुग्ण बरे

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 4 लाख 90 हजार 262 एवढी झाली आहे. 10,300 new corona patients in state today, 10,900 patients cured.

एमपीसी न्यूज- राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील 10 हजार 906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 10 हजार 483 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 66.73 टक्के  एवढे आहे. 

_MPC_DIR_MPU_IV

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 4 लाख 90 हजार 262 एवढी झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात 3 लाख 27 हजार 281 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 1 लाख 45  हजार 582  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज 300 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.49 टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण 300 मृत्यूंपैक़ी 229 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 40 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

उर्वरित 31 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 31 मृत्यू रायगड जिल्हा-14, ठाणे- 4, नाशिक -4, पालघर-3, पुणे ३, जळगाव- 1, कोल्हापूर -1 आणि मुंबई – 1 असे आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 25 लाख 69 हजार 645 नमुन्यांपैकी 4 लाख 90 हजार 265 नमुने पॉझिटिव्ह (19.07 टक्के) आले आहेत. राज्यात 9 लाख 82 हजार 75 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 262 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.