BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत 11 प्रतिनिधींची फेरनिवड

एमपीसी न्यूज- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन प्रतिनिधींच्या निवडणुकीत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी 155 उमेदवारांमधून 31 प्रतिनिधी निवडण्यात आले. यापैकी 11 प्रतिनिधी हे यापूर्वीच्या समितीमधील असून मागील समितीच्या कामाबद्दल समाधान आणि विश्वास दाखवत या 11 प्रतिनिधींची फेरनिवडकरण्यात आली आहे.

या निवडणुकीत युनियनच्या सहा हजार ५०० हून अधिक सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाचे प्रमाण 99 टक्के झाले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन पुणे यांनी नियुक्त केलेल्या 8 सदस्यीय निवडणूक समितीच्या देखरेखीखाली पार पडली. ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन निवडणूक समिती अध्यक्ष विजय सुदर्शनी यांनी समाधान व्यक्त केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like