Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,320 नवे रुग्णांची नोंद तर 7,543  रुग्ण झाले कोरोनामुक्त

10,320 new corona patients reported in State today, 7,543 persons cured.

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचे आज 7543  रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 56 हजार 158 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.68 टक्के आहे. आज 10,320 नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 50 हजार 662 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज 265 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.55 टक्के एवढा आहे. राज्यातील एकूण मृतसंख्या 14 हजार 994 इतकी झाली आहे.

राज्यामध्ये आजच्या एका दिवसात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. पुणे मनपा क्षेत्रात आजच्या एका दिवसात कोरोनाचे 1635 रुग्ण वाढले, यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58,559  एवढी झाली आहे.

पुण्यात आजच्या दिवसात 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आत्तापर्यंत 1,440 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

मुंबईमध्ये आज कोरोनाचे 1085 रुग्ण सापडले आहेत. यामुळे मुंबईतली कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 14 हजार 284  एवढी झाली आहे.

आजच्या एका दिवसात मुंबईमध्ये 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतली कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 6,353 एवढी झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 21 लाख 30 हजार 98 नमुन्यांपैकी 4 लाख 22 हजार 118 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात 8 लाख 99 हजार 557 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या 39 हजार 535 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.