Alandi : श्री ज्ञानोबा माउलींच्या पालखीची पुण्याच्या दिशेने वाटचाल

आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीचे स्वागत

एमपीसी न्यूज- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज सकाळी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीचे स्वागत भोसरीतील मॅक्झिन चौकात करण्यात आले.

‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी’ या अभंगाने सारेगम फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आपल्या सुरेल आवाजात भक्तांचे मनोरंजन केले. भोसरी येथील मॅक्झिन चौकात माऊलींच्या पालखी बरोबर असणा-या दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किट, टोप्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार महेश लांडगे, पूजा लांडगे, हभप चंद्रकांत वांजळे महाराज यांच्या उपस्थित दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, जनसेवा बॅंकेचे विलास लांडगे, रामशेठ गावडे, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, माजी नगरसेवक धनंजय भालेकर, आलम शेख, निर्मला गायकवाड, पोपट फुगे आदी उपस्थित होते.

भक्तांच्या स्वागतासाठी भजनांजली प्रस्तुत गायनांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सादरकर्ते सारेगम फेम ज्ञानेश्वर मेश्राम, सहगायिका रेखा मानवलकर यांच्या सुमधुर आवाजाने पालखीत रंगत आली. त्यांना राजेश बधे (पखवाज), अभय नलये, कैलाश काशीद (हार्मोनियम), अनिल भुजबळ (तबला), लक्ष्मण मीठे (ताळ) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.